औरंगाबादेत कोरोनाचा १० वा बळी, एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २९१

0
466
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबादेत कोरोनाच्या संसर्गाने बीड बायपास रोडवरील देवळाई परिसरातील एका ५५ वर्षीय रूग्णाचा बळी घेतला असून त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १० झाली आहे. दरम्यान, आज सकाळी आणखी ९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २९१ वर पोहोचली आहे.

आज शहरात नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णांमध्ये जयभीम नगरातील ३, पुंडलिक नगरातील २, नंदनवन कॉलनी, सावित्री नगर (चिकलठाणा), पंचशील दरवाजा (किलेअर्क), देवळाई येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

दरम्यान, शहरातील बीड बायपास रोडवरील देवळाई परिसरातील कोरोना बाधित  असलेल्या ५५ वर्षीय पुरूष रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) रविवारी रात्री ११ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शहरात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १० झाली आहे

मृत्यू झालेल्या या व्यक्तीस तीन दिवसांपासून रुग्णास खोकला, चक्कर येण्याचा त्रास होत होता. अतिशय गंभीर स्थितीत त्यांना घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे ऑक्स‍िजनचे प्रमाण केवळ ५४ टक्के होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर कृत्रिम श्वासोश्वास व कोरोना संबंधी उपचार सुरू होते. त्यांना दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिआ, मधुमेहाचा आजार होता, असेही डॉ. येळीकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा