पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार

0
131

नवी दिल्लीः देशातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (१४ एप्रिल) सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानेच ही माहिती दिली आहे.

शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी देशातील लॉकडाऊन आणखी वाढवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे उद्याच्या संबोधनात मोदी नेमकी काय घोषणा करतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा उद्या २१ वा आणि शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी मोदी देशासाठी कोणत्या प्रकारच्या नवीन धोरणाची घोषणा करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा