औरंगाबादः बायजीपुऱ्यातील तरूणाची गरोदर आईही कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रूग्ण २७ वर

1
416
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: मुंबईहून औरंगाबादेत परत आलेल्या १७ वर्षीय तरूणाची गरोदर आईही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. गुरूवारी तिच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. किराडपुऱ्यातील आणखी एक २२ वर्षीय तरूण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २७ वर पोहोचली आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

मागील बारा दिवसांपासून तीन दिवस वगळता शहरात रोज कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. यातच बुधवारी एकही रूग्ण आढळला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला होता.  मंगळवारी सायंकाळी बायजीपुर्‍यातील १७ वर्षीय तरूणाचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. १० एप्रिल रोजी हा तरूण आई-वडिलांसह मुंबईहून शहरात आला होता. मंगळवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला.  बायजीपुऱ्यात त्याच्या संपर्कात आलेल्या  ८ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल काय येतो, याकडे लक्ष लागलेले होते. या १७ वर्षाच्या तरूणाच्या वडिलांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. सोबतच त्याच्या आईचाही स्वॅब घेण्यात आलेला होता. तो अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. विशेष म्हणजे ही महिला गरोदर आहे.

हेही वाचाः हिंदू- मुस्लिम कोरोनाग्रस्तांसाठी रुग्णालयात वेगवेगळे वॉर्डः गुजरातेत भाजप सरकारचाच आदेश

दुसरीकडे किराडपुरा येथे आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. एका २२ वर्षीय तरूणाचा स्वॅब सशंयित म्हणून तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारच्या खंडानंतर गुरूवारी पुन्हा दोन अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने औरंगाबादेतील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता २७ वर पोहोचली आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून दोन महिला उपचाराने बर्‍या होऊन घरी परतल्या आहेत. तर २४ रूग्ण सध्या घाटी व जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत आहेत.

हेही वाचाः कोरोनाचे संकटः ४७ टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात, देशातील ४ शहरांत तब्बल ६१ टक्के मृत्यू!

 गरोदर महिलेला बरे करण्याचे आव्हान बायजीपुरा येथील कोरोना बाधित तरूणाची कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेली आई गरोदर आहे. गरोदरपणातच तिला कोरोना विषाणूची बाधा झाल्यामुळे तिच्यावर उपचार करण्याचे खरे आव्हान आता जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांसमोर आहे.गरोदर असल्याने तिच्या पोटातील बाळावर परिणाम होणार नाही, अशा प्रकारच्या औषधींचा वापर करावा लागणार आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा