काही दिवसांत येणार कोरोना लस, किंमत आणि लसीकरणाबाबत राज्यांशी चर्चेनंतर फैसलाः मोदी

0
75
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना लस विकसित करण्याबाबत भारतीय वैज्ञानिकांना पूर्ण विश्वास आहे. तज्ज्ञांच्या मते कोरोना लसीसाठी फारकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, काही आठवड्यांतच ती तयार होऊ शकते. या लसीची किंमत आणि लसीकरणाबाबत राज्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र यांनी म्हटले आहे.

 प्रधानमंत्री मोदी यांनी शुक्रवारी देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षीय बैठक घेतली. या बैठकीत विविध राजकीय पक्षांचे नेते आणि केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते. लसीकरणाबाबत माहिती देताना मोदी म्हणाले की, पहिल्यांदा ही लस ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्यानंतर आघाडीच्या मोहिमेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.

जगाचे लक्ष्य भारतावरः जगाचे लक्ष कमी किंमतीच्या आणि सुरक्षित कोरोना लसीवर आहे. त्यासाठी स्वाभाविकच जगाचे लक्ष भारताकडे आहे. काही आठवड्यांत कोरोनाची लस येईल. तज्ज्ञांचा हिरवा कंदील मिळताच देशात लसीकरणाला सुरुवात केली जाईल. लसीच्या किंमतीबाबत राज्यांशी चर्चा सुरू आहे. लोकांचे आरोग्य लक्षात घेऊनच लसीची किंमत निश्चित केली जाईल, असेही मोदी म्हणाले.

देशात आठ कोरोना लसीवर काम सुरुः देशात आठ कोरोना लसींवर काम सुरु आहे. या आठ लसी चाचणीच्या टप्प्यात तयार झालेल्या आहेत. पुढील काही आठवड्यांत कोरोना लसींबाबत चांगली बातमी ऐकायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. वैज्ञानिकांकडून मंजुरी मिळताच लसीकरणाचे काम सुरु केले जाईल. प्रत्येकापर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी भारत एक सॉफ्टवेअर विकसित करत आहे. मोठ्या प्रमाणावर लस वितरणाबाबत केंद्र सरकार काम करत आहे. राज्यांच्या मदतीने ते प्रत्यक्षात आणले जाईल, असेही मोदी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा