वाधवान कुटुंबाचा हवापालट भोवलाः गृह खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

0
171
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  लॉकडाऊन असूनहीयस बँक घोटाळ्यातील आरोपी आणि डीएचएलएफचे प्रमोटर्स कपिल वाधवान आणि यांना कुटुंबातील सदस्य आणि नोकरचाकरांसह २३ लोकांच्या लवाजम्यासह खंडाळ्याहून महाबळेश्वरला जाण्याचे शिफारसपत्र देणारे गृह खात्याचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरूवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास या कारवाईची घोषणा केली.  वाधवान कुटुंबीय बुधवारी रात्री हवा खाण्यासाठी खंडाळ्याहून महाबळेश्वरला पोहोचल होते.

कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे लॉकडाऊन घोषित करून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत गृह खात्याचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीय हे आपले ‘कौटुंबिक मित्र’ असल्याचे सांगत त्यांना पाच वाहनातून खंडाळ्याला जाण्याची परवानगी देणारे विशेष शिफारसपत्र बुधवारी दिले होते. हा प्रकार उघडकीस येताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरूवारी रात्री उशिरा चर्चा करून अमिताभ गुप्ता यांना त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय जाहीर केला. ही कारवाई करताना कायदा सर्वांसाठी समान असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर कपिल वाधवान आणि अन्य २२ जणांविरुद्ध लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवून त्यांना पाचगणी येथे संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांना येथेच १४ दिवस रहावे लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा