सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना थर्ड इयरला बढतीः विद्यापीठ परीक्षांबाबत यूजीसीची शिफारस

0
1087
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कॅरी फॉर्वर्डच्या नावाने द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षांत बढती देण्यात यावी मात्र कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षा घेण्यात यावी, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्थापन केलेल्या समितीने केली आहे. दरम्यान, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा घेण्याबाबत आणि नव्या शैक्षणिक सत्राच्या प्रारंभ कधी करायचा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य विद्यापीठांनाच दिले जाण्याचे संकते यूजीसीने दिले आहेत.

वार्षिक परीक्षेचा कालावधी तीन तासांऐवजी दोन तासांचा करण्यात यावा. ५० टक्के गुणांचीच वार्षिक परीक्षा घेण्यात यावी आणि ५० टक्के गुण आधीच्या सेमिस्टर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे देण्यात यावेत. त्याचबरोबर २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने करण्यात यावा, अशी शिफारसही या समितीने केली आहे.

हेही वाचाः पालघर प्रकरणी आकांडतांडव करणारा भाजप बुलंदशहरातील साधूंच्या हत्येप्रकरणी चिडीचूप का?

३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चितीः १६ मे ते ३१ मेदरम्यान ऑनलाइन पद्धतीने प्रोजेक्ट रिपोर्ट्स, अंतर्गत मूल्यांकन, अभ्यासक्रम पूर्ण करणे , इंटर्नशिप व प्लेसमेंटचे काम पूर्ण करण्यात यावे. १ जून ते ३० जूनपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्या देण्यात याव्यात. सर्व विद्यापीठांनी २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत प्रवेशासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी आणि ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रियेद्वारे विविध पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश अनुमती देण्यात यावी, अशा शिफारशीही यूजीसीच्या या समितीने केल्या आहेत.

हेही वाचाः गाढव गेलं आता ब्रह्मचर्याची परीक्षा…!

प्रबंधासाठी सहा महिने अतिरिक्त कालावधीः पीएच.डी. एम.फिल. स्कॉलर्सना त्यांची पदवी पूर्ण करण्यासाठी आणि शोधप्रबंध सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यात यावा, असेही या समितीने म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी यूजीसीने अकॅडमिक कॅलेंडर, प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा घेण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत यूजीसीने स्थापन केलेल्या दोन्ही समित्यांच्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली. मात्र कोणत्याही एका समितीच्या शिफारशींवर अद्याप निर्णय झालेला नाही.

हेही वाचाः नफेखोरीचा ‘मास्टरस्ट्रोक’: आयसीएमआरला विकलेल्या रॅपिड टेस्ट किटमध्ये १४५ टक्के नफा!

स्थानिक परिस्थिती पाहून सोयीनुसार सत्रारंभः देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना त्यांच्या सोयीनुसार प्रलंबित परीक्षांच आयोजन आणि नव्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ करण्याबाबत यूजीसीकडून जास्तीचे स्वातंत्र्य दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र नव्या शैक्षणिक सत्रात सुट्याची संख्या कमी केली जाण्याची शक्यता आहे. प्रलंबित परीक्षा आणि नवीन शैक्षणिक सत्राचा प्रारंभ याबाबत यूजीसी लवकरच विद्यापीठे आणि महाविद्यालयांना मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे, असे वृत्त दि प्रिंटने दिले आहे.

हेही वाचाः राज्यपालांनी विधान परिषदेवर पाठवलेच नाही तर ठाकरेंची खुर्ची हिरावण्यात भाजप यशस्वी होईल?

परीक्षा कधी आणि कशा घ्यायच्या याचे विद्यापीठांनाच स्वातंत्र्यः परीक्षा कधी आणि कशा घ्यायच्या आणि शैक्षणिक सत्राचा प्रारंभ कधी करायचा याबाबत विद्यापीठांना जास्तीची लवचिकता आणि स्वातंत्र्य दिले जाईल. कोणत्या भागात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे आणि कोणत्या भागत कमी हे लक्षात घेऊन प्रत्येक गोष्ट स्थानिक परिस्थिती आणि वातावरणावर अवलंबून राहील. आम्ही सोमवारच्या बैठकीत दोन्ही समित्यांच्या अहवालावर चर्चा केली आहे. त्या समित्यांच्या शिफारशींच्या आधारे विद्यापीठांना लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, असे यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी दि प्रिंटला सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा