आजपासून निवडक रेल्वे स्टेशनवर तिकिट रिझर्व्हेशन काऊंटर उघडणार

0
66
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः रेल्वेने १ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० विशेष रेल्वे गाड्यांसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन तिकिट बुकिंगची यंत्रणा कोलमडल्यामुळे रेल्वे स्टेशनवरील रिझर्व्हेशन काऊंटर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून निवडक रेल्वे स्टेशनवर रिझर्व्हेशन काऊंर उघडले जातील. शुक्रवारपासून तिकिट एजंटांमार्फत सामान्य सेवा केंद्रावरही रेल्वे रिझर्व्हेशन करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

देशभरातील रेल्वेसेवा २५ मार्चपासून बंद आहे. स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी १ मेपासून श्रमिक स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यांच्या मागणीनुसार या रेल्वे अजूनही सुरू आहेत. त्यानंतर आता १ जूनपासून २०० स्पेशल रेल्वे चालवल्या जाणार आहेत. ३० जूनपर्यंत रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार नसल्याचे आधी रेल्वेने जाहीर केले होते. मात्र अचानक निर्णय बदलून १ जूनपासून रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोस्टातही करता येईल रिझर्व्हेशनः आरक्षित तिकिटांचे बुकिंग आणि आरक्षण रद्द करण्याची सुविधा पोस्ट ऑफिस आणि यात्री तिकिट सुविधा केंद्रांवरही उपलब्ध असेल. रेल्वे परिसरात पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम आणि सामान्य सेवा केंद्रांनाही ऑफलाइन तिकिट बुकिंगची परवानगी देण्यात आली आहे. सर्व ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग पाळणे अनिवार्य असेल, असे रेल्वेने जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.

डेटा फीड न झाल्यामुळे प्रवाशांची तारांबळः लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपताच १ जूनपासून स्पेशल रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरूवारपासून तिकिट बुकिंगही सुरू केले होते. ही सुविधा फक्त आयआरसीटीसीची वेबसाइट आणइ ऍपवरच उपलब्ध होती. परंतु वेळेवर सर्व रेल्वे गाड्यांचा ऑनलाइन डेटा फीड होऊ न शकल्यामुळे शंभरहून अधिक रेल्वेचे तिकिट बुकिंग पूर्वनिर्धारित वेळेनुसार गुरूवारी सकाळी १० वाजेपासून सुरू होऊ शकले नाही. गुरूवारी सकाळी बुकिंग सुरू झाले तेव्हा आयआरसीटीसीच्या सर्व्हरमध्ये केवळ ५० रेल्वे गाड्यांचा डेटाच फीड झालेला होता. रेल्वेच्या भाषेत याला फायरिंग असे म्हटले जाते. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. आपल्या मार्गावरील रेल्वे गाड्यांबाबतची माहिती आयआरसीटीसीच्या बेवसाइटवर दिसतच नसल्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा