मुंबईत कोरोनाचा दुसरा बळी, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७४ वर

0
156
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी युद्धपातळीवर खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत असतानाच आज मुंबईत एका ५६ वर्षीय कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील हा कोरोनाचा दुसरा बळी आहे. दरम्यान, आज राज्यात १० नवीन कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७४ वर गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढू लागली आहे.

 कोरोनामुळे दगावलेल्या या व्यक्तीवर मुंबईतील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. २१ मार्च रोजी रूग्णालयात दाखल केलेल्या या व्यक्तीला मधुमेह, उच्चरक्तदाब आणि ह्रदयाशी संबंधित आजारही होते. या व्यक्तीच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून तिच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, राज्यात आज आणखी १० नवीन कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले असून त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ७४ वर गेला आहे. त्यापैकी ६ रूग्ण मुंबईतील तर ४ रूग्ण पुण्यातील आहेत. नव्याने आढळलेल्या रूग्णांपैकी ५ जणांनी परदेशात प्रवास केलेला आहे तर इतर ४ जण त्यांच्या संपर्कात आलेले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा