औरंगाबादेत कोरोनाचा दुसरी बळी, ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू

0
474
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादेत कोरोना विषाणूच्या संसर्गाने आज दुसरा बळी घेतला. आरेफ कॉलनीतील ७० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा आज मृत्यू झाल्यामुळे औरंगाबादेतील कोरोना बळींची संख्या दोन झाली आहे.

आज कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती आरेफ कॉलनीतील रहिवासी असून त्याच्या कुटुंबातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची निकट सहवासित होती. या व्यक्तीच्या स्वॅब तपासणीचा अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला होता. या आधी औरंगाबादेत ५ एप्रिल रोजी सातारा परिसरातील एका ५८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, औरंगाबादेत काल सोमवारीच ४ जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २४ वर पोहोचली होती. एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत चालली असतानाच दुसरीकडे कोरोनाने औरंगाबादेत दुसरा बळी घेतला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा