मोदीजी, भय आणि चिंतेच्या वातावरणाचा तुम्हीच तर उत्सव केला, मग काय होणार? : राऊतांचा टोला

0
351
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू करूनही लोकांना त्याचे फारसे गांभीर्य नाही, अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल चढवला असून ‘’ प्रिय पंतप्रधानजी, भय आणि चिंतेच्या वातावरणातही तुम्ही उत्सवासारखी परिस्थिती निर्माण केला, तर मग असेच होणार, सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर होईल, असा सणसणीत टोला हाणला आहे.

रविवारी देशभरात जनता कर्फ्यु पाळला जात असताना कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, पोलिस व अन्य यंत्रणांतील लोकांना धन्यवाद देण्यासाठी सायंकाळी पाच वाजता टाळी, थाळी, घंटी किंवा शंख वाजवण्याचे आवाहन मोदींनी देशातील जनतेला केले होते. परंतु लोकांनी सायंकाळी पाच वाजता घोळक्याने गर्दी करून टाळ्या, थाळ्या आणि घंट्या वाजवून मिरवणुका काढल्या. त्यामुळे दिवसभर घरात राहून गर्दी टाळण्याच्या आणि एकमेकांच्या संपर्कापासून दूर राहण्याच्या प्रयत्नावर पाणी फेरले गेले. त्यावर कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही टिकास्त्र सोडले होते.

हेही वाचाः कोरोना विषाणुशी लढण्यासाठी फक्त लॉकडाऊन हा रामबाण उपाय नव्हेः डब्ल्यूएचओचा इशारा

लॉकडाऊनला अद्यापही अनेक लोक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. कृपया आपल्या स्वतःला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा, निर्देशांचे गांभीर्याने पालन करा. नियम आणि कायद्याचे पालन करवून घ्या, असे माझे राज्य सरकारांना आवाहन आहे, असे ट्विट मोदींनी केले आहे.

मोंदीच्या या ट्विटवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. आमच्या पंतप्रधानांना चिंता आहे की, लॉकडाऊनला लोक अद्यापही गांभीर्याने घेत नाहीत. प्रिय पंतप्रधानजी, तुम्हीच भय आणि चिंतेच्या वातावरणातही उत्सवासारखी परिस्थिती निर्माण केली तर असेच होणार. सरकार गंभीर असेल तर जनताही गंभीर होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू, महाराष्ट्रात १५ नव्या रूग्णांची भर

हेही वाचाः महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू, घराबाहेर पडणाऱ्यांच्या धरपकडीसाठी पोलिसांची विशेष पथके

आपच्या नेत्या प्रतिभा सिंग यांनीही मोदींवर टिकास्त्र सोडले आहे. तुमच्यामुळेच लोणचे पसरले आहे. तुमचे भक्त लोक किती निरक्षर आहेत, हे माहीत असूनही हवाबाजी करण्याची काय गरज होती?, असा सवाल त्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा