मुंबईची इटली होणारः कंगना रनौतची बहीण रंगोलीकडून सोशल मिडीयावर अफवा

0
154

मुंबईः मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे मुंबईकर धास्तावले असतानाच चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतची बहीण रंगोली चांडेल हिने ‘मुंबईची इटली होईल’ अशी अफवा सोशल मिडीयावर पसरवली आहे.

रंगोली चांडेल हिने १४ एप्रिल रोजी एक ट्विट केले आहे. त्यात तिने ‘मुंबईची इटली होणार’ असे बेधडक विधान केले आहे. मात्र या विधानाला कोणताही तर्क किंवा आधार दिलेला नाही. मात्र तिच्या या बेधकड विधानामुळे कोरोनाच्या संसर्गामुळे आधीच धास्तावलेल्या मुंबईकरांमध्ये आणखी भितीचे वातावरण निर्माण करण्यात भर पडण्याचा धोका आहे. रंगोलीने केलेल्या या ट्विटला १५ एप्रिल री दुपारी ३.१५ वाजेपर्यंत २०.३ हजार लोकांनी लाइक केलेले आहे तर जवळपास ४ हजार लोकांनी रिट्विट केलेले आहे. या बेधकड विधानाबरोबरच रंगोलीने मुंबईकरांसाठी पुढे आणखी आव्हाने येतील आणि त्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, असेही म्हटले आहे. रंगोलीचे ट्विटवर ९४.१ हजार फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, रंगोली सोशल मिडीयावर अफवा पसरवत असून मुंबईकरांमध्ये घबराट निर्माण करत आहे. तिच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या मागणीवर आता मुंबई पोलिस रंगोलीविरुद्ध काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा