मुंबई-ठाण्यात नवे सहा कोरोनाग्रस्त रूग्ण, महाराष्ट्रातील बाधितांची संख्या १२२ वर

0
161

मुंबईः महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढू लागली असून आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२२ वर गेली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित ५ रूगण मुंबईतील तर एक रूग्ण ठाण्यातील आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बाब चिंतेत भर टाकणारी असली तरी घाबरून जाऊ नका आणि योग्य ती खबरदारी घ्या, असे आवाहन आरोग्य मंत्री टोपे यांनी केले आहे.

एकीकडे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली तरी दुसरीकडे देशातील पहिले दोन कोरोनाग्रस्त रूग्ण कोरोनामुक्त करण्यात महाराष्ट्राला यश आले आहे. आज गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातील दोन कोरोनाग्रस्तांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा