राज्यातील कोरोना बाधित रूग्ण वाढीचा वेग मंदावला, रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर!

0
36

मुंबई: राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सध्या ५८ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०१ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख १७ हजार ६८३ नमुन्यांपैकी १ लाख २० हजार ५०४ नमुने पॉझिटिव्ह (१६.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८१ हजार ६५० लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात २२०३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ९२ हजार १४१ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा