खबरादारी घ्याः औरंगाबादेत पुन्हा आढळले १७० कोरोनाबाधित रुग्ण, चार जणांचा मृत्यू

0
419
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात आटोक्यात आलेली कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवाळीत बाजारपेठेत झालेल्या गर्दीने पुन्हा वाढताना दिसू लागली आहे. गुरुवारी जिल्ह्यात १७० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी बुधवारी १३८ रुग्ण आढळून आले होते. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४२ हजार ८४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यातील १ हजार १२८ जण मृत्युमुखी पडले आहेत.

दरम्यान, गुरुवारी औरंगाबाद महापालिका हद्दीतील ६९ आणि ग्रामीण भागातील १० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ७१६ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

 औरंगाबाद महापालिका हद्दीत १४२ रुग्ण आढळले. त्यात

उदय संस्कार अपार्टमेंट, गारखेडा २, बजरंग चौक परिसर १,  एन ४ सिडको १, माया नगर एन-२ सिडको १, मिसारवाडी १, बजरंग नगर, चिकलठाणा १, अजंता कॉलनी १, जालान नगर २, भाग्यनगर १,  श्रेय नगर २,  म्हाडा कॉलनी ३, दशमेश नगर २, गुरुप्रसाद नगर १, बेगमपुरा १, देवगिरी व्हिला, मिटमिटा १, दाणाबाजार छावणी १, वसंत नगर जवाहर कॉलनी १, अलोक नगर १, सुधाकर नगर १, एन-४ सिडको २, टिव्ही सेंटर १, वसंत नगर एन-४ सिडको १, टिळक नगर वीर सावरकर चौक १, शिवाजी नगर १, सातारा परिसर १, चाटे स्कूल बीबीपी १, गृह निर्माण योजना, शिवाजी नगर १, शास्त्री नगर ४, जुब्ली पार्क १,  कार्तिका रेस देवळाई रोड परिसर १, प्रोझोन मॉल चिकलठाणा १, व्यंकटेश नगर बीड बायपास परिसर २, रो हाऊस, हर्सूल १, एन-११ हडको १, मिलिट्री हॉस्पिटल छावणी १, अंबर हिल जटवाडा रोड परिसर १, हर्सूल १, सुयोग कॉलनी, एन-८ सिडको १, एन-९ शिवनेरी कॉलनी १, श्री. हाऊसिंग सोसायटी एन-८ सिडको २, एन-१२ सिडको १, एन-९ श्रीकृष्ण नगर १, लघुउद्योग कॉलनी, चिकलठाणा १, घाटी परिसर १, भारत नगर गारखेडा १, शिवाजीनगर १, एन-७ १, गुरू रामदास नगर १, लोटा कारंजा २, नारळीबाग १, सातारा परिसर १, अन्य ७७ रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात २८ रुग्ण आढळले. त्यात सिल्लोड १, चिंचोली, कन्नड १, तीसगाव बजाजनगर १, करंजखेडा १, नवगाव, पैठण १, कालीमठ, उपळा,कन्नड १,  वडनेर, कन्नड २, नाथ विहार, पैठण १, गजान हॉस्पिटल पैठण १, पिशोर,कन्नड १, तलवाडा, कन्नड १,  जामगाव, गंगापूर १, होली गल्ली, सिल्लोड  १, पडेगाव, सिल्लोड १, जयभवानी नगर सिल्लोड १, नवजीवन कॉलनी, वैजापूर १, पिंपळवाडी १, अन्य  १० रुग्ण आहेत.

 चार कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत राज नगर येथील ६० वर्षीय स्त्री, एन सहा सिडकोतील ६४ वर्षीय पुरूष, भाडजी, खुलताबाद येथील ४६ वर्षीय स्त्री आणि खासगी रूग्णालयात गारखेडा येथील ६२ वर्षीय पुरूष पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

ही घ्या खबरदारीः घराबाहेर पडताना मास्क वापरा. सॅनिटायजरने हाताचे वारंवार निर्जंतुकीकरण करून घ्या. हस्तांदोलन टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर राखा. वारंवार हात धुवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा