औरंगाबादेत आणखी तीन रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण बाधितांची संख्या १४

0
502

औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज तीन पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडल्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. या सर्व रूग्णांवर चिकलठाणा येथील विशेष कोरोना रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सातारा परिसरातील बाजीराव पेशवे नगरातील ५८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला होता. नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये त्या व्यक्तीची पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. तर जलाल कॉलनीतील एक १७ वर्षीय मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

दरम्यान, घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात कार्यरत असलेला आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या परिचारकाने ( ब्रदर) पैठण येथील शशी विहार भागातील सासरवाडीलाही भेट दिल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्रीत त्याच्या सासरवाडीतील सहा जणांना औरंगाबादला तपासणीसाठी आणले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा