औरंगाबादेत कोरोनाचे आणखी ३ नवीन रूग्ण, एकूण बाधितांची संख्या ३५ वर

0
474
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद : औरंगाबादेतील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा हळूहळू वाढत चालला आहे. आज कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले तीन नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रूग्णांची संख्या ३५ झाली आहे, अशी माहिती चिकलठाण्यातील विशेष कोरोना रूग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. विशेष म्हणजे जुन्या दोन कोरोना बाधित रूग्णांची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

 चिकलठाण्यातील विशेष कोरोना रूग्णालय म्हणजेच जिल्हा सामान्य रूग्णालयात ४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २४ रुग्णांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ३६ जणांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेऊन ते घाटी रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ७ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.

आज नव्याने आढळून आलेल्या तीन कोरोना बाधित रुग्णांमुळे औरंगाबादेतील एकूण रूग्णसंख्या ३५ वर पोहोचली असू औरंगाबाद शहर रेड झोनमध्येच कायम आहे. आज आढळून आलेल्या  तीन रूग्णांसह १५ रुग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षात तर दोन रूग्णांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या २८ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा