औरंगाबादः हिलाल कॉलनीतील एकाच कुटुंबातील ३ महिला कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रूग्णसंख्या ४७

0
277
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादच्या हिलाल कॉलनीतील एकाच कुटुंबातील तीन महिलांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या महिला त्यांच्या कुटुंबातील कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्या. यामुळे शहरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४७ वर पोहोचली आहे.

कोरोनाची बाधा झालेल्या या महिलांचे वय १८, २६ आणि ३१ वर्षे आहे. या महिलांना संशयित म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयात १८ आणि घाटी रूग्णालयात २ अशा एकूण २० कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे कोरोना संसर्गातून अनेक रूग्ण मुक्तही होत आहेत. काल शुक्रवारी जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती असलेल्या ६ कोरोना बाधितांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत औरंगाबादेतील २२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा