विद्यापीठ, महाविद्यालयीन परीक्षांचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर होणार

0
131
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई :  कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षांचा मोठा पेच निर्माण झाला आहे. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातील परीक्षा बाबतचे वेळापत्रक जाहीर केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या गाईडलाइन्स या राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्याप्रमाणे एफवाय आणि एसवायच्या परीक्षा १ जुलै ते १५ जुलै दरम्यान घेण्यात याव्यात. शिवाय १२ वीचा निकाल लागल्यानंतर प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन १ सप्टेंबरपर्यंत पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता उद्या आणि परवा तंत्र शिक्षण विभागाचे संचालक आणि राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू या गाईडलाइन्सनुसार राज्यातील विद्यापीठांसाठीचे अंतिम वेळापत्रक दोन-तीन दिवसात ठरवतील, असे उदय सामंत यांनी सांगितले. हे वेळापत्रक मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या निदर्शनास आणून पुढील दोन-तीन दिवसात राज्यातील परीक्षाबाबतचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे सामंत म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा