औरंगाबादेतील कोरोना बाधितांची संख्या १,२४१, आज आढळले २३ रूग्ण

0
134
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली असून आज २३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नव्याने आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ हजार २४१ झाली आहे.

आज औरंगाबादेत औरंगपुरा, सिडको एन-८, सिडको एन-४, गणेश नगर, ठाकरे नगर सिडको एन-२, बजरंग चौक एन-७, एमजीएम परिसर, सिडको एन-५, हडको एन- १२, सादाफ नगर, रेहमानिया कॉलनी, महेमूदपुरा, न्याय नगर, बायजीपुरा, पुंडलिक नगर, पहाडसिंगपुरा, भवानी नगर या भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथेही एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये १७ पुरूष आणि ६ महिलांचा समावेश आहे.

हेही वाचाः औरंगाबादेत १००% लॉकडाऊनचा आदेश कुणाचा? केंद्रेकरांचा नव्हे माझा: मनपा आयुक्तांचा कोर्टात दावा

एकूण ४६ जणांचा मृत्यूः औरंगाबादेत एकीकडे कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली असताना दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत चालली आहे. शुक्रवारी दिवसभरात ४ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. खासगी रूग्णालयतही उपचार घेत असलेल्या एका रूग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या ४६ वर पोहोचली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र रोज नवीन वसाहतीत कोरोना फैलाव होताना दिसत आहे.

हेही वाचाः बौद्धस्थळ अयोध्या ट्रेंडिंगः अयोध्येतील प्राचीन अवशेष सम्राट अशोक काळातील असल्याचा दावा

६२५ रूग्णांवर उपचार सुरूः औरंगाबाद जिल्ह्यात आजवर आढळून आलेल्या एकूण १ हजार २४१ रूग्णांपैकी आतापर्यंत ५७० रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ६२५ रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबादेतील कोरोनाची साखळी तोडणे आणि फैलाव रोखणे हे मोठे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा