महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या १२९७, एकट्या मुंबईत आढळले १४३ रुग्ण

0
117

मुंबईः महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १२९७ वर पोहोचली असून एकट्या मुंबईत १४३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्येत एकूण १६२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये पुण्यात ३, पिंपरी-चिंचवडमध्ये २, यवतमाळमध्ये १, औरंगाबादेत ३, ठाण्यात १, नवी मुंबईत २, कल्याण- डोंबिलवलीत ४, मीरा-भाईंदरमध्ये १, वसई- विरारमध्ये १ आणि सिंधुदुर्गमध्ये १ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा