औरंगाबादेत आज दिवसभरात आढळले १४५ नवीन रूग्ण, एकूण बाधितांची संख्या २ हजार ४२०

0
69

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी १३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ४२० झाली आहे. यापैकी १ हजार ३१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १२१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ९८२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. आज सकाळीच १३२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते. त्यामुळे आज दिवसभरात आढळलेल्या कोरोना बाधित रूग्णांची संख्या १४५ झाली आहे.

दुपारनंतर आढळलेल्या रूग्णांत वेदांत नगर (१), एसआरपीएफ परिसर (२), जिल्हा परिषद परिसर (१), इटखेडा (१), बजाज नगर (१), साईनगर, पंढरपूर (१), उत्तम नगर, जवाहर कॉलनी (१), संजय नगर, बायजीपुरा (२), शहागंज (१), जटवाडा रोड (१), अन्य (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १० पुरूष आणि ०३ महिला रुग्णांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा