भारतातील कोरोना बाधितांची संख्या १ लाख ५१ हजार ७६७ वर, २४ तासांत ६ हजार ३८७ नवे रूग्ण

0
91
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात ६८ दिवसांचा लॉकडाऊन लागू करूनही रूग्णसंख्येत होणारी वाढ काही कमी झालेली नाही. गेल्या २४ तासांत देशात ६ हजार ३८७ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून देशातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या १ लाख ५१ हजार ७६७ झाली आहे. देशभरात आजवर कोरोनाने ४ हजार ३३७ लोकांचे बळी घेतले आहेत.

देशः देशात गेल्या २४ तासांत १७० लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ८३ हजार ४ ऍक्टिव्ह कोरोना रूग्ण आहेत. महाराष्ट्रात २ हजार ९१ नवीन रूग्ण आढळून आल्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ५४ हजार ७५८ झाली आहे. आसाममध्ये २३ नवीन रूग्ण आढळून आल्यामुळे तेथील रूग्णसंख्या ६६६ झाली आहे. झारखंडमध्येही १८ रूग्ण आढळून आले असून आतापर्यंत तेथे ४२६ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तामिळनाडूतही ६४६ नवीन रूग्ण सापडल्याने तेथील कोरोना बाधितांची संख्या १७ हजार ७२८ झाली आहे. तामिळनाडूत आजवर १२७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

दुनियाः जगभरात ५६ लाख ८४ हजार ८०३ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर ३ लाख ५२ हजार २२५ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या १७ लाख २५ हजार २७५ झाली आहे तर १ लाख ५७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने ब्रिटनमध्ये ३७ हजार ४८ तर इटलीमध्ये ३२ हजार ९५५ लोकांचे बळी घेतले आहेत. फ्रान्समध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या २८ हजार ५३० तर स्पेनमध्ये २७ हजार ११७ झाली आहे. पाकिस्तानमध्ये ५७ हजार ७०५ लोकांना कोरोनाची बाधा झाली असून १ हजार १९७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा