राज्यात कोरोनाचे एकूण २२ हजार १७१ रुग्ण; आज १,२७८ नवे रूग्ण, ५३ जणांचा मृत्यू

0
104

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ४,१९९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यमुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची एकूण संख्या ८३२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील १९, पुण्यातील ५, जळगाव शहरात५, धुळे शहरात २, धुळे ग्रामीण भागात १, पिंपरी चिंचवडमध्ये १, अहमदनगरमध्ये १, औरंगाबाद शहरात १, नंदूरबारमध्ये १, सोलापूर शहरात १ तर वसई-विरारमध्ये १ मृत्यू झाला. मालेगाव शहरातील १४  मृत्यू हे २७ एप्रिल ते १० मे २०२० या कालावधीतील आहेत. त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशमधील एक मृत्यू आज मुंबई येथे झाला आहे. 

आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २० महिला आहेत. या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १९ रुग्ण आहेत तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत १७ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७५ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजवर २ लाख ३८ हजार चाचण्याः आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २ लाख ३८ हजार ७६६ नमुन्यांपैकी २ लाख १५ हजार ९०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२ हजार १७१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४४ हजार ३२७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १४ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी):

मुंबई महानगरपालिका: १३, ७३९ (५०८)
ठाणे: १२१ (२)
ठाणे मनपा: ८८० (८)
नवी मुंबई मनपा: ८२६ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ३५१ (३)
उल्हासनगर मनपा: २६
भिवंडी निजामपूर मनपा: ३० (२)
मीरा भाईंदर मनपा: २१४ (२)
पालघर: ३४ (२)
वसई विरार मनपा: २२९ (१०)
रायगड: ९२ (१)
पनवेल मनपा: १३८ (२)
ठाणे मंडळ एकूण रूग्णः १६,६८०  एकूण मृत्यूः ५४४

नाशिक ग्रामीण : ५९
नाशिक मनपा: ३८
मालेगाव मनपा:  ५६२ (३४)
अहमदनगर ग्रामीण: ५४ (३)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे ग्रामीण: ९ (३)
धुळे मनपा: ४५ (३)
जळगाव ग्रामीण: १४४ (१२)
जळगाव मनपा: ३४ (७)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण रूग्णः ९७६  एकूण मृत्यूः ६४

पुणे ग्रामीण: १६२ (५)
पुणे मनपा: २३७७ (१४६)
पिंपरी-चिंचवड मनपा: १४० (४)
सोलापूर ग्रामीण: ९
सोलापूर मनपा: २४१ (११)
सातारा ग्रामीण: ११९ (२)
पुणे मंडळ एकूण रूग्णः ३०४८  एकूण मृत्यूः १६८

कोल्हापूर ग्रामीणः १३ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली ग्रामीण: ३३
सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)
सिंधुदुर्ग: ६
रत्नागिरी: ३६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण रूग्ण: ९८  एकूण मृत्यूः ३

औरंगाबादःग्रामीणः ९३
औरंगाबाद मनपा: ४७५ (१३)
जालना: १२
हिंगोली: ५९
परभणी ग्रामीण: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण रूग्णः ६४१  एकूण मृत्यूः १४

लातूर ग्रामीण: २५ (१)
लातूर मनपा: १
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड ग्रामीण: ४
नांदेड मनपा: ३९ (३)
लातूर मंडळ एकूण रूग्णः ७३  एकूण मृत्यूः ४

अकोला ग्रामीण: १७ (१)
अकोला मनपा: १४२ (१०)
अमरावती ग्रामीण: ४ (१)
अमरावती मनपा: ७८ (११)
यवतमाळ: ९६
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण रूग्णः ३६२  एकूण मृत्यूः २४

नागपूर ग्रामीण: २
नागपूर मनपा: २४९ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर ग्रामीण: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण रूग्ण: २५७  एकूण मृत्यूः २

इतर राज्ये रूग्णः  ३६  एकूण मृत्यूः ९

एकूण रूग्णः  २२ हजार १७१   एकूण मृत्यूः ८३२

(टीपःही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी १६०६९२३ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा