राज्यात कोरोनाचे आज १,२३० नवीन रुग्ण, ३६ जणांचा मृत्यू; एकूण रुग्ण २३ हजार ४०१

0
59

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१ झाली आहे. आज १२३० नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५८७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४७८६ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २०, सोलापूर शहरात ५, पुण्यात ३ , ठाणे शहरात २, अमरावती जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, नांदेड शहरात १, रत्नागिरी मध्ये १ तर वर्धा जिल्ह्यात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय  उत्तर प्रदेशमधील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे.   आज झालेल्या मृत्यूंपैकी २३  पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७  रुग्ण आहेत तर १६  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७५ टक्के )  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

२ लाख १८ हजार स्वॅब चाचण्याः आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २ लाख १८ हजार ९१४  नमुन्यांपैकी १ लाख ९३ हजार ४५७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २३ हजार ४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. (प्रयोगशाळा नमुन्यांचे आकडे आय सी एम आर पोर्टलप्रमाणे अद्ययावत करण्यात आले आहेत.) राज्यात २ लाख ४८ हजार ३०१ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १५ हजार १९२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १४,५२१ (५२८)
ठाणे ग्रामीण: १२५ (२)
ठाणे मनपा: ९२७ (१०)
नवी मुंबई मनपा: ८९८ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ३६६ (३)
उल्हासनगर मनपा: ३०
भिवंडी निजामपूर मनपा: ३२ (२)
मीरा भाईंदर मनपा: २१४ (२)
पालघर: ३७ (२)
वसई विरार मनपा: २४९ (१०)
रायगड: १२३ (१)
पनवेल मनपा: १३९ (२)
ठाणे मंडळ एकूण: १७,६६१ (५६६)

नाशिक ग्रामीण: ६०
नाशिक मनपा: ४०
मालेगाव मनपा:  ५९५ (३४)
अहमदनगर ग्रामीण: ५४ (३)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे ग्रामीण: ९ (३)
धुळे मनपा: ४५ (३)
जळगाव ग्रामीण: १४५ (१२)
जळगाव मनपा: ३५ (७)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १०१५ (६४)

पुणे ग्रामीण: १६६ (५)
पुणे मनपा: २४७८ (१४९)
पिंपरी चिंचवड मनपा: १४७ (४)
सोलापूर ग्रामीण: ९
सोलापूर मनपा: २८७ (१६)
सातारा: १२१ (२)
पुणे मंडळ एकूण: ३२०६ (१७६)

कोल्हापूर ग्रामीण: १३ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली ग्रामीण: ३३
सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)
सिंधुदुर्ग: ६
रत्नागिरी: ४२ (२)
कोल्हापूर मंडळ एकूण: १०४ (४)

औरंगाबाद ग्रामीण: ९३
औरंगाबाद मनपा: ४९१ (१४)
जालना: १४
हिंगोली: ६०
परभणी ग्रामीण : १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ६६० (१५)

लातूर ग्रामीण: २६ (१)
लातूर मनपा: ५
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड ग्रामीण: ४
नांदेड मनपा: ४१ (४)
लातूर मंडळ एकूण: ८० (५)

अकोला ग्रामीण: १८ (१)
अकोला मनपा: १४४ (१०)
अमरावती ग्रामीण: ५ (२)
अमरावती मनपा: ७८ (११)
यवतमाळ: ९७
बुलढाणा: २५ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ३६८ (२५)

नागपूर ग्रामीण: २
नागपूर मनपा: २५७ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर ग्रामीण: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २६६ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण रूग्णः  २३ हजार ४०१   एकूण मृत्यूः ८६८

(टीपःही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा