राज्यात एकूण ३,३२० कोरोना बाधित रूग्ण, पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले

0
137
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई : राज्यात आज ११८ नवीन कोरोना बाधितरुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३३२० झाली आहे. आज दिवसभरात ३१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३१ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शुक्रवारी राज्यात ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या २०१ वर गेली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ५, पुण्यातील २ जण आहेत. त्यापैकी ५ पुरुष तर २ महिला आहेत. आज झालेल्या ७ मृत्यूपैकी ६ जण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये (७१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०१ झाली आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३३० कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५८५० सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी २०.५० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा