एकाच दिवशी ११३ रूग्णांची भरः महाराष्ट्रात ७४८ जण कोरोना पॉझिटिव्ह, ४५ जणांचा मृत्यू

0
133
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई: राज्यात रविवारी एकाच दिवशी ११३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यामुळे राज्यातील रुग्ण संख्या ७४८ झाली आहे. राज्यात आज कोरोनाने १३ जणांचे बळी घेतले असून एकूण मृतांचा आकडा ४५ वर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रविवारी राज्यात १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील ८,  पुण्यातील ३ तर  कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबादेतील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. रविवारी मृत्युमुखी पडलेल्यांपैकी १२ जणांनी कोठेही परदेशी प्रवास केलेला नव्हता किंवा कोरोनाबाधितांचे त निकट सहवासितही नव्हते. मृतांपैकी एक जण कोरोनाबाधिताचा निकट सहवासित होता.

जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह रुग्णः
मुंबईः ४५८ (मृत्यूः ३०)
पुणे (शहर व ग्रामीण भाग)- १०० (मृत्यूः ०५)
सांगलीः २५ 
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपाः ८२ (मृत्यूः ०६)
नागपूरः १७
अहमदनगरः २१
यवतमाळ,उस्मानाबादः प्रत्येकी ४ 
लातूरः ८
औरंगाबादः ७ (मृत्यूः ०१)
बुलढाणाः ५ (मृत्यूः ०१)
साताराः ३
जळगावः २  (मृत्यूः ०१)
कोल्हापूर, रत्नागिरीः  प्रत्येकी २   
सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशीम, अमरावती (मृत्यूः ०१), हिंगोलीः  प्रत्येकी १
इतर राज्यः २
एकूणः ७४८ मृत्यूः ४५

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १६ हजार ८ नमुन्यांपैकी १४ हजार ८३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर ७४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४६ हजार ५८६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३१२२ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा