औरंगाबादः समतानगरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळले, एकूण बाधितांची संख्या ३८

0
373

औरंगाबादः औरंगाबादेत आज आणखी दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३८ वर गेली आहे. विशेष म्हणजे नव्याने आढळून आलेले हे दोन्ही रूग्ण समतानगर परिसरातील असून अवघ्या तीनच दिवसांत समतानगरातील कोरोना बाधितांची संख्या ५ झाली आहे.

औरंगाबादेत कोरोना विषाणूने  दोन दिवसांपासून तीन नवीन वसाहतींत शिरकाव केला असून या भागातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी सध्या केली जात आहे. यात समतानगरातून तीनच दिवसांत पाच रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आरोग्य विभागाने या भागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचाः औरंगाबादेत भावसिंगपुरा, आरेफ कॉलनीतील कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, मृतांची एकूण संख्या ५

बुधवारी आढळलेल्या दोन रूग्णांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३८ झाली आहे. पैकी प्रत्यक्षात १८ रुग्ण घाटी व मिनी घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ३८ पैकी पाच जणांचा मृत्यू झाला, तर १५ रुग्ण  उपचारानंतर बरे झाले आहेत. यातील एक घाटी रुग्णालय, पंधरा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचाः मूळ व्हिडीओत म्हटले होते ‘ओए बस्स’, लोकांनी व्हायरल केले ‘शोएब बस्स’!

आरेफ कॉलनीनंतर समतानगर हॉटस्पॉटः समतानगर येथे आढळून आलेल्या या दोन पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. हे दोन्ही नवीन रुग्ण समतानगरात सुरूवातीला आढळलेल्या ३८ वर्षीय व्यक्‍तीच्या संपर्कातील आहेत.  ही व्यक्ती काच आणि फर्निचरचे काम करते. यात एक ५२ वर्षीय पुरुष व दुसरा २५ वर्षीय तरुण आहेत. त्यामुळे आता समतानगर येथील संख्या पाचवर गेली आहे. आरेफ कॉलनीत सर्वाधिक 9 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ आता समतानगर हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे.
हेही वाचाः नांदेडमध्ये आढळला कोरोना संक्रमित पहिला रुग्ण, पिरबुऱ्हाणनगरातील ६४ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह
औरंगाबादची स्थिती अशीः
कोरोनामुळे मृत्यूः ०५
उपचारासाठी भरतीः १८
बरे होऊन घरी गेलेलेः १५
एकूण रुग्णसंख्याः ३८

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा