औरंगाबादेत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तीन गुंडांना अटक, दोघे फरार

0
2668
औरंगाबादेत पोलिसांवर हल्ला करून पसार होणारे हेच ते पाच गुंड. त्यापैकी अटक केले दोघे (खालील छायाचित्रे)

औरंगाबादः कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढाईत स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणाऱ्या पोलिसांवर औरंगाबादेत हल्ला करणाऱ्या तीन समाजकंटकांना पोलिसांनी अटक केली असून आणखा दोघे जण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या गुंडांच्या जीवघेण्या हल्ल्यात दोन वाहतूक पोलिस जखमी झाले आहेत.

औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांवर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे चौकात काही गुंडांनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला होता. हल्ला करून पाच हल्लेखोर पसार झाले होते. त्यापैकी तीन जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून दोन फरार गुंडांचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचाः औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांवरच गुंडांचा हल्ला, दोन जखमी

वाहन का अडवले म्हणून हुज्जत घालत या गुंडांनी पोलिसांवर त्यांच्याच दंडुक्याने जीवघेणा हल्ला केला होता. हे गुंड अमानुषपणे पोलिसांना मारहाण करत असल्याचे या हल्ल्याच्या व्हिडीओत दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा