राज्यात आज कोरोनाचे १,४९५ नवीन रुग्ण, ५४ मृत्यू; एकूण रुग्णांची संख्या २५ हजार ९२२

0
78
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. आज १,४९५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज ४२२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ५,५४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २ लाख ३० हजार ८५७ नमुन्यांपैकी २ लाख ०३ हजार ४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २५ हजार ९२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २१३ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १४ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

एकट्या मुंबईत ४० मृत्यूः आज राज्यात ५४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे मृतांची एकूण संख्या ९७५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २,  औरंगाबाद शहरात २, वसई विरारमध्ये १ तर १ मृत्यू रत्नागिरीमध्ये झाला आहे. मृतांमध्ये ३३ पुरुष तर२१ महिला आहेत.  आज झालेल्या ५४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९  रुग्ण आहेत तर २१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ५४ रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १५,७४७ (५९६)
ठाणे ग्रामीण: १५७ (३)
ठाणे मनपा: ११२२ (११)
नवी मुंबई मनपा: १०१८ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४१२ (३)
उल्हासनगर मनपा: ७२
भिवंडी निजामपूर मनपा: ३९ (२)
मीरा भाईंदर मनपा: २४५ (२)
पालघर: ४० (२)
वसई विरार मनपा: २८६ (११)
रायगड: १५८ (२)
पनवेल मनपा: १५० (८)
ठाणे मंडळ एकूण रूग्ण: १९,४४६  एकूण मृत्यूः ६४४

नाशिक ग्रामीण: ८८
नाशिक मनपा: ४६
मालेगाव मनपा:  ६१७ (३४)
अहमदनगर ग्रामीण: ५४ (३)
अहमदनगर मनपा: १०
धुळे ग्रामीण: ९ (३)
धुळे मनपा: ६२ (३)
जळगाव ग्रामीण: १६२ (१७)
जळगाव मनपा: ४४ (९)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण रूग्ण: १११४  एकूण मृत्यूः ७१

पुणे ग्रामीण: १८० (५)
पुणे मनपा: २८३० (१६१)
पिंपरी-चिंचवड मनपा: १५१ (४)
सोलापूर ग्रामीण: ९
सोलापूर मनपा: ३११ (२१)
सातारा: १२५ (२)
पुणे मंडळ एकूण रूग्णः  ३६०६  एकूण मृत्यूः १९३

कोल्हापूर ग्रामीण: १६ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली ग्रामीण: ३५
सांगली मिरज कुपवाड मनपा: ६ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ६० (३)
कोल्हापूर मंडळ एकूण रूग्ण: १३०  एकूण मृत्यूः ५

औरंगाबाद ग्रामीण:९४
औरंगाबाद मनपा: ५८६ (१७)
जालना: १६
हिंगोली: ६१
परभणी ग्रामीण: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण रूग्ण : ७५९  एकूण मृत्यूः १८

लातूर ग्रामीण: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ४
बीड: १
नांदेड ग्रामीण: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
लातूर मंडळ एकूण रूग्ण: ९४  एकूण मृत्यूः ५

अकोला ग्रामीण: १८ (१)
अकोला मनपा: १७४ (११)
अमरावती ग्रामीण: ५ (२)
अमरावती मनपा: ८४ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २५ (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण रूग्ण : ४०८ मृत्यूः २६

नागपूर ग्रामीण: २
नागपूर मनपा: ३१५ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर ग्रामीण: १
चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण रूग्णः ३२४  एकूण मृत्यूः ३

इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण रूग्ण:  २५ हजार ९२२   एकूण मृत्यूः ९७५

(टीपः ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा