देश-दुनिया कोरोना अपडेटः देशातील कोरोना बाधितांची संख्या ८५,९४०, २,७५२ रूग्णांचा मृत्यू

0
14
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः  भारतात कोरोना बाधितांची संख्या ८५ हजार ९४० झाली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाने २ हजार ७५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४६ लाख २८ हजार ५६३ झाली आहे तर ३ लाख ८ हजार ६४५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशः भारतात गेल्या २४ तासांत ३ हजार ९७० लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर १०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी १ हजार ५७६ लोकांना कोरोनाची बाधा झाली. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा २९ हजारांवर गेला आहे तर १ हजार ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत १७ हजार ६७१ कोरोना बाधित आढळले आहेत तर ६५५ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ५७ झाली आहे. तेथे आग्रा, कानपूर, मेरठ, लखनऊ आणि नोएडामध्ये कोरोनाचा संसर्ग आहे. राजस्थानातील कोरोना बाधितांची ४ हजार ८३८ झाली आहे तर १२५  लोकांचा मृत्यू झाला आहे.

दुनियाः अमेरिकेत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या १४ लाख ८४ हजार २८५ झाली आहे तर ८८ हजार ५०७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये ३३ हजार ९९८ लोक कोरोना बाधित आहेत तर इटलीमध्ये कोरोनाने ३१ हजार ६१० लोकांचे बळी घेतले आहेत. स्पेनमध्ये २७ हजार ४५९तर फ्रान्समध्ये २७ हजार ५३९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये ३८ हजार ७९९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर ८३४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा