जगभरात १५ लाखांहून अधिक लोक संक्रमित, ८८ हजार मृत्यू

0
40

नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर थैमान घातले असून आजपर्यंत जगभरातील १५ लाख १८ हजार ७१९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून आतापर्यंत ८८ हजार ५०२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतामध्ये गेल्या २४ तासांत ५४० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार ७३४ वर गेला आहे तर मृतांचा आकडा १६६ वर गेला आहे.
चीनमध्ये कोरोना संसर्गाचे ६३ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचे मुख्य केंद्र असलेल्या वुहानमधील लॉकडाऊन चीनने नुकताच उठवला आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये नव्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. झारखंडमध्ये कोरोना संसर्गामुळे पहिला मृत्यू झाला आहे. राज्यातील बोकारो, रांची परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एकाच दिवशी १९०० जणांचे मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत एकूण कोरोना बाधितांची संख्या ४,३५, १२८ झाली आहे तर १४,७९५ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये ६ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
स्पेनमध्येही कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत चालला आहे. स्पेनमध्ये १,४८,२२० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर १४,७९२ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत चालला आहे. इटलीत १७,६६९ जणांचे बळी घेतले आहेत.तर १३९, ४२२ लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. फ्रान्समध्ये १०,८६९ जणांचा मृत्यू झाला तर ११२,९५० लोकांना संसर्ग झाला आहे.
दिल्लीमध्ये ९३ जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व लोक निझामुद्दीन मरकझमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. दिल्लीमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६६९ वर गेली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिल्लीमधील २० हून अधिक परिसर सील करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा