उद्यापासून आठवडी बाजार, मुंबई मेट्रो, ग्रंथालये सुरू होणार; शाळा-कॉलेजात ५० टक्के उपस्थिती

0
429

मुंबईः राज्य सरकारने उद्या दिनांक १५ ऑक्टोबरपासून राज्यातील आठवडी बाजार, ग्रंथालये आणि मुंबई मेट्रो सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने आज या संबंधीची नियमावली जाहीर केली आहे.

 लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील आठवडी बाजारही उद्यापासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जनावरांचे बाजारही भरवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील सर्व आठवडी बाजार उद्यापासून सुरू होतील. त्यासाठी स्थानिक स्वराज संस्थांचे नियम लागू असतील.

 राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी ग्रंथालयेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ग्रंथालयांचे नियमित सॅनिटायझेशन, शारीरिक अंतराचे पालन, अशा अटी ग्रंथालयांना घालण्यात आल्या आहेत.

 उद्या गुरूवारपासून मुंबईतील मेट्रो सेवाही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नगरविकास विभागाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लागू राहतील. त्याचे काटेकोर पालन करावे, असे राज्य सरकारने आज जारी केलेल्या नियमावलीत म्हटले आहे.

शाळा/महाविद्यालयांत ५० टक्के उपस्थितीः शाळा-महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. मात्र शाळा/महाविद्यालयांत ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला मुभा देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा