BigBreaking: दारूची दुकाने सुरू होणार, पण एकावेळी दुकानात फक्त ५ जणांनाच परवानगी

1
3620
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशभरातील तळीरामाची तगमग आता लवकरच संपुष्टात येणार असून दारूची दुकाने उघडण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे कठोर पालन करण्याच्या अटीवर देशात वाइन शॉप्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आज ३ मे रोजी संपणारा लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी म्हणजेच १७ मेपर्यंत वाढवला आहे. या लॉकडाऊन टप्पा-३ साठी नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार वाइन शॉप्स, पान, तंबाखूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार आहे. माफ या दुकानांवर कमीत कमी सहा फुटांचे सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे. तसेच वाइन शॉप्स किंवा पान टपऱ्यांवर एकावेळी पाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही.त्यामुळे तळीरामांची तगमग तर थांबणार आहेच, शिवाय लॉकडाऊनमुळे खडखडाट झालेल्या सरकारच्या तिजोरीतही महसूल यायला सुरूवात होणार आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा