सरकारी कार्यालयांना सुटी नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण

0
703
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील सरकारी कार्यालये सात दिवस बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. लोकल आणि बससेवा अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे त्याही बंद करण्यात येणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारी कार्यालये बंद करण्यात आलेली नाहीत. फक्त घरून कामकाज करण्याबाबत विचार करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा. कोणीही कुठेही गर्दी करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.

 दरम्यान, राज्यात २६ पुरूष आणि १४ महिला असे एकूण ४० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बस, लोकल बंद करणार नाही. परंतु गर्दी करू नका, अन्यथा मला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा