शेण आणि गोमुत्राने अर्थव्यवस्था भक्कम होतेः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे मत

0
82
छायाचित्र सौजन्यःट्विटर

भोपाळः गाईच्या बळावर देशाची अर्थव्यवस्था भक्कम करता येऊ शकते, असे गाईच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपचे म्हणणे आहे. गाईचे शेण आणि गोमुत्राच्या बळावर कोणतीही व्यक्ती आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो आणि देशाची अर्थव्यवस्थाही भक्कम केली जाऊ शकते, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे.

 इंडियन व्हेटरनरी असोसिएशनच्या वतीने महिला पशुचिकित्सकांसाठी आयोजित ‘शक्ती-२०२१’ कार्यक्रमात ते बोलत होते. जर आपण ठरवले तर गाईचे पालन, तिचे शेण आणि गोमुत्राद्वारे आपण आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतो आणि देशाची अर्थव्यवस्थाही भक्कम करू शकतो. आपल्याला ते करावे लागेल. आज नाही तर उद्या आपल्याला यश मिळणार हे निश्चित आहे. गाईच्या गोमुत्रापासून खत, किटकनाशक, औषधे अशा अनेक गोष्टी तयार करता येतात. मध्य प्रदेशातील स्मशान घाटांवर गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांचा वापर करून लाकडाचा उपयोग कमी करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री चौहान म्हणाले. गोपालनावर संशोधन करा, म्हणजे छोटे शेतकरी आणि पशुपालकांना त्याचा फायदा होईल, असा सल्लाही चौहान यांनी उपस्थित पशु चिकित्सकांना दिला.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला गोपालन करत आहेत. त्यामुळे डेअरी व्यवसाय समृद्ध झाला आहे, असे या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय पशुपालन, मत्स्य पालन व दुग्ध व्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला म्हणाले.

विशेष म्हणजे केंद्रातील भाजप सरकारने २०१९ च्या अंतरिम अर्थसंकल्पात गाईसाठी वेगळी तरतूद केली होती आणि गोपालनावर कोट्यवधी रुपये खर्चाच्या योजनेची घोषणा केली होती. अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अनेक मोठी आश्वासनेही दिली होती. त्यांनी गाईसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना आणि कामधेनू योजनेची घोषणा केली होती. गोमताच्या सन्मान आणि गोमातेसाठी हे सरकार कधीही मागे हटणार नाही. जे आवश्यक असेल ते काम करेल, असेही गोयल म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा