परमबीर सिंगांनी मोक्का लावून ३.४५ कोटी रुपये उकळलेः बुकीची फिर्याद, अन्य दोघांच्याही तक्रारी

0
455
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. परमबीर सिंग यांच्याविरोधातील नवनवीन प्रकरणे उजेडात येत आहेत. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना त्यांनी आपल्याविरुद्ध मोक्काची कारवाई करून ३ कोटी ४५ लाख रुपये उकळले, असा खळबळजनक आरोप करणारी फिर्याद क्रिकेट बुकी सोनी जालान यांनी  राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे. याशिवाय आणखी दोन व्यावसायिकांनीही परमबीर सिंगांनी धमकी देऊन १ कोटी २५ लाख रपये उकळल्याची तक्रार केली आहे.

 परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना २०१८ मध्ये क्रिकेट बुकी सोनू जालाना याच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई केल्यानंतर परमबीर सिंग यांनी तब्बल ३ कोटी ४५ लाख रुपये उकळल्याचा आरोप करणारी फिर्याद सोनू जालान याने राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे. सोनू जालान याने त्याच्या फिर्यादीमध्ये  तत्कालीन एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांची नावेही घेतली आहेत.

 सोनू जालान याच्याव्यतिरिक्त व्यावसायिक केतन तन्ना आणि नूर अहमद पठाण यांनीही परमबीर सिंग यांच्याविरोधात पोलिस महासंचालकांकडे स्वतंत्र तक्रारी केल्या आहेत. या तिघांनाही आपल्या तक्रारीच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पाठवल्या आहेत. परमबीर सिंग यांनी धमकी देऊन आपल्याकडून १ कोटी २५ लाख रुपये उकळल्याची तक्रार केतन तन्ना यांनी दिली आहे.

हेही वाचाः माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची हाय कोर्टात धाव, सीबीआयचा एफआयआर रद्द करण्याची मागणी

या तिघांनाही स्वतंत्ररित्या दाखल केलेल्या तक्रारींत परमबीर सिंग यांच्यासह अन्य दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी अकोला पोलिस नियंत्रण कक्षातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनीही परमबीर सिंग यांच्याविरुद्ध पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली असून सिंग यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचाः परमबीर सिंगांचे काळे कारनामेः भेट म्हणून घेतली ४० तोळे सोन्याची बिस्किटे, बदल्यांसाठी १ कोटी!

परमबीर सिंग हे सध्या महाराष्ट्र होमगार्ड्सचे महासंचालक आहेत. उद्यागपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटकासह आढळलेली स्कॉर्पिओ कार आणि सचिन वाझे प्रकरण व्यवस्थित न हाताळल्याचा ठपका ठेवत त्यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांनी या तक्रारींबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचाः परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा, विविध २२ कलमान्वये नोंदवला एफआयआर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा