विराट कोहलीने भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले!

0
20
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः आपल्या वैशिष्ट्येपूर्ण खेळीमुळे क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला स्टार फलंदाज विराट कोहलीने भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने आपला निर्णय जाहीर केला. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत राजीनाम्याची घोषणा केली. मागील वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर बीसीसीआयने विराटला एक दिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवले आणि टी-२० व वनडे संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली होती.

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे त्याने ही कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विराट कोहलीऐवजी के.एल. राहुलला या सामन्यासाठी भारताचा कर्णधार बनवण्यात आले होते. या कसोटीत विराटची अनुपस्थिती भारताला महागात पडली हा सामना भारताला गमवावा लागला होता. विराटने कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता या संघाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शनिवारी सायंकाळी विराटने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत राजीनाम्याची घोषणा केली. सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले. त्यात कोणतीही कसर ठेवली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढउतार आले. माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढउतार आले. परंतु या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची किंवा आत्मविश्वासाची कमरता आली नाही. माझा नेहमीच १२० टक्के देण्यावर विश्वास होता, असे विराटने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

 विराटच्या नेतृत्वाखाली भारताचा कसोटी संघ एका वेगळ्याच उंचीवर पोहाचला होता. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ ६८ कसोटी सामने खेळला. त्यातील ४८ लढतीत भारतीय संघाला यश मिळवता आले. विराट भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होता. ३३ वर्षीय विराटकडे २०१४ मध्ये कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ९९ सामने खेळले असून ७ हजार ९६२ धावा केल्या. यातीस ६८ सामन्यात विराटने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आणि ५ हजार ८६४ धावा केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा