भाजपचा धुव्वा! दादरा-नगर हवेलीत फडकला शिवसेनेचा भगवा, कलाबेन डेलकर विजयी

0
671
संग्रहित छायाचित्र.

दादरा-नगर हवेलीः दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या पोटनिवडणुकीत माजी खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी प्रचंड मोठ्या फरकाने म्हणजेच ४७ हजार ४४७ मतांनी विजय मिळवला आहे.

दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत २२ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांना १ लाख १२ हजार ७४१ मते मिळाली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आणि भाजप उमेदवार महेश गावीत यांना ६३ हजार ३८२ मते मिळाली. निवडणूक आयोगाने दुपारी दोन वाजता ही माहिती जाहीर केली आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोहन डेलकर यांनी भाजपचे तत्कालीन खासदार नटूभाई पटेल यांचा ९००१ मतांनी पराभव केला होता. डेलकर यांनी २२ फेब्रुवारी रोजी २०२१ रोजी आत्महत्या केल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. मोहन डेलकर हे आधी काँग्रेसमध्ये आणि नंतर भाजपमध्येही होते.

 कलाबेन डेलकर यांच्या या विजयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्राबाहेर पहिले पाऊल. दादरा नगर हवेली मार्गे दिल्लीच्या दिशेने मोठी कूच असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा