आंबेडकरी अनुयायांना ‘बौद्धिक दहशतवादी’ संबोधले, रामदेवच्या पतंजलीवर बहिष्कार मोहीम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामसानी यांचे अनुयायी बौद्धिक दहशतवादी आहेत, असे वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मंगळवारी देशभरातील आदिवासी- दलित कार्यकर्ते पतंजलीच्या उत्पादनाची होळी करणार आहेत.

0
270
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार ई. व्ही. रामसामी यांच्या अनुयायांना ‘बौद्धिक दहशतवादी’ संबोधणारे योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात देशभरातील आंबेडकरी- पेरियार यांच्या अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली असून असंख्य दलित आणि आदिवासी संघटनांनी पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी देशभरात पतंजलीच्या उत्पादनांची होळी करण्यात येणार आहे.

  पत्रकार अर्णव गोसावी यांच्या टीव्ही कार्यक्रमात पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी द्रविड नेते पेरियार यांच्या मूलनिवासी तत्वज्ञानावर टीका करतानाच पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना ‘बौद्धिक दहशतवादी’ संबोधले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही लोक आंबेडकरांच्या नावाखाली मूलनिवासी संकल्पनेचा डांगोरा पिटत आहेत. बामसेफचे काही लोक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी मी एक शब्द शोधून काढला आहे. तो शब् आहे, ‘बौद्धिक दहशतवादी’ असे रामदेव या व्हिडीओत सांगताना दिसत आहेत.अन्य एका व्हिडीओत बाबा रामदेव रामसामी पेरियार यांच्या मूलनिवासी संकल्पनेवर टीका करताना त्यांचा उल्लेख अपमानास्पदरित्या नास्तिक करताना ऐकायला मिळत आहे.

 रामदेव यांच्या या खोडसाळपणानंतर देशभरातील दलित- आदिवासी कार्यकर्त्यांनी ट्विटरवर #ArrestRamdev, #BoycottPatanjali आणि #ShutDownPatanjali हॅशटॅग चालवण्यास सुरूवात केली असून बाबा रामदेव यांना तत्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. त्याचबरोबर आंबेडकरी- पेरियार अनुयायांची एकसंधता दर्शवण्यासाठी #JaiPeriyarJaiBhim हा हॅशटॅगही सुरू केला आहे.

 अखिल भारतीय आंबेडकर महासभा, अखिल भारतीय मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाज कर्मचारी फेडरेशन आणि भीम आर्मीने रामदेव यांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून बाबा रामदेव मनुस्मृतीचे उदात्तीकरण करत असल्याचा आरोप केला आहे. आंबेडकर महासभेते मंगळवारी देशभर पतंजलीच्या उत्पादनांची होळी करण्याचेही आवाहन केले आहे.

रामदेव जे बोललो त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. रामदेव मनुवादी विचारसरणीवर विश्‍वास ठेवतात, हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. आम्ही पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्काराचे आवाहन केले आहे.

  • अशोक भारती, आंबेडकर महासभेचे अध्यक्ष

 बाबा रामदेव यांनी स्वदेशी लोकांच्या मूलनिवासी अस्मिस्तेवरच हल्ला केला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. पतंजलीच्या उत्पादनांवर आदिवासी समाजाने बहिष्कार टाकावा, असे आम्ही आवाहन करतो.

  • हंसराज मीना, ट्रायबल आर्मी

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा