राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय लवकरच घेऊः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
61

उस्मानाबादः राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. तेव्हा त्यांनी हे स्पष्ट संकेत दिले.

या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी मंदिरे सुरू केलेली नाहीत. एकाचवेळी सर्व गोष्टी सुरू केल्याने परदेशांमध्ये कोरोनाची पुन्हा मोठी लाट आलेली दिसून येत आहे. मात्र मंदिरे खुली करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी माझे कुटुंबाची जबाबदारी मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन कोविडचा प्रतिबंध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

काटगाव येथील पीक नुकसानीची पाहणीः मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या पाहणीची सुरुवात काटगाव (ता. तुळजापूर) येथील शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून झाली. यावेळी येथील पुलावरून आठ ते दहा फूट पाणी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सोयाबीन, ऊस व द्राक्ष या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी येथील शेतकऱ्यांना धीर दिला व शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या नुकसानीबाबत लवकरच मदत देणार असल्याचे सांगितले.

 यावेळी हरिदास माळी व इतर शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. काटगाव ग्रामस्थांची भेट घेऊन आज येथे तुम्हाला भेटण्यासाठी व या आपत्तीच्या परिस्थितीत दिलासा देण्यासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कात्री अपसिंगा (ता. तुळजापूर) या गावास भेट देऊन तेथील पीक नुकसानीची पाहणी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा