कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

0
99
छायाचित्र सौजन्यः ट्विटर.

बेंगळुरूः कर्नाटकातील बेंगळुरूच्या सदाशिव नगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला असून त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत.

कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरूतील सदाशिव नगरात गुरूवारी रात्री काही समाजकंटकांनी शिवरायांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून पुतळ्याची विटंबना केली. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

या घटनेनंतर या परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाले. शेकडो शिवप्रेमींनी धर्मवीर संभाजी चौकात एकत्र येऊन रस्ते बंद केले. यावेळी दगडफेकीच्या घटनाही घडल्या. या घटनेचे पडसाद आज बेळगावमध्येही उमटले. बेळगावात बंदसारखी स्थिती आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनेचे पडसाद कोल्हापुरातही उमटले. कोल्हापुरात संतप्त शिवसैनिकांनी शहरातील कर्नाटकच्या व्यावसायिकांची हॉटेल्स बंद केली. कर्नाटकच्या लाल पिवळ्या झेंड्याची होळी केली.

गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकातील काही संघटना आणि समाजकंटकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अवमान करण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. त्यातच सदाशिव नगरातील पुतळ्याच्या विटंबनेची ही ताजी घटना घडली आहे. त्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले आहेत.

संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती हि शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजी यांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काशीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करतात, तर दुसरीकडे कर्नाटकात आपल्या महाराजांचा अवमान करण्यात आला आहे. ही संतापजनक दृश्य भाजप शासित कर्नाटकच्या बेंगळुरूतील आहेत. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. हिंदूनो उठा आणि जागे व्हा, हीच वेळ आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा