देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणूकः काँग्रेसचे अंतापूरकर ३०,२६६ मतांनी आघाडीवर

0
668
संग्रहित छायाचित्र.

नांदेडः नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून एकवीसाच्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर हे ३० हजार २६६ मतांनी आघाडीवर आहेत.

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अटीतटीची होत आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अटीतटीची होत आहे. १२ व्या फेरीत अंतापूरकर यांना ७८ हजार ७२३ मते मिळाली. भाजपचे सुभाष साबणे यांना ४८ हजार ६५७ मते मिळाली आहेत. अंतापूरकर हे ३० हजार २६६ मतांनी आघाडीवर आहेत.

आधी वीसाव्या फेरीत काँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना ७४ हजार ८२१ मते मिळाली. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना ४७ हजार ०५८ मते मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्तम इंगोले यांना ८०११ मते मिळाली आहेत. विसाव्या फेरीत अंतापूरकर यांनी २७ हजार ७६३ मतांची आघाडी घेतली होती.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर हे आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या सलग १६ फेऱ्यात त्यांनी आपली आघाडी कायम राखली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा