निवडणूक निकाल अपडेटः २९ व्या फेरीत देगलूर- बिलोलीत अंतापूरकरांना ४१,५५७ मतांची आघाडी

0
114
संग्रहित छायाचित्र.

नांदेडः देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी आतापर्यंत ४१ हजार ५५७ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यांना आतापर्यंत १ लाख ७ हजार ३२९ मते मिळाली आहेत. तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना ६५ हजार ७७२ मते मिळाली आहेत.

देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आतापर्यंत मतमोजणीच्या २९ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने २९ व्या फेरीची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार काँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना २९ व्या फेरी अखेर १ लाख ७ हजार ३२९ मते मिळाली आहेत. भाजपचे सुभाष साबणे यांना ६५ हजार ७७२  मते मिळाली आहेत.  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्तम इंगोले यांना ११ हजार ९७ मते मिळाली आहेत.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

सध्या ३० व्या फेरीची मतमोजणी सुरू आहे. एकूण ३० फेऱ्यात ही मतमोजणी होणार आहे. असे असले तरी अंतापूरकर यांनी घेतलेली मतांची आघाडी पाहता त्यांचा विजय झाल्यात जमा असल्याचे मानले जात आहे.

 २९ व्या फेरीअखेर अन्य उमेदवारांना मिळाली मते अशीः

  • विवेक केरूरकर (संयुक्त जनता दल)- ४६१
  • प्रा. परमेश्वर वाघमारे ( बहुजन समाज पार्टी)-१५३
  •  डी.डी. वाघमारे (रिपाइं-खोब्रागडे)-२१३
  • अरूण दापकेकर (अपक्ष)-१४२
  •  साहेबराव गजभारे (अपक्ष)-१८१
  •  भगवान खंदारे (अपक्ष)- २७०
  •  मारोती सोनकांबळे (अपक्ष)-२३८
  • विमल वाघमारे (अपक्ष)- ४८६
  •  कॉ. प्रा. सदाशिव भूयारे (अपक्ष)- ४८२
  • नोटाः १०९०

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा