निवडणूक अपडेटः देगलूर-बिलोलीत काँग्रेसचे अंतापूरकर यांना ३७ हजार २६२ मतांची आघाडी

0
192
संग्रहित छायाचित्र.

नांदेडः देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी आतापर्यंत ३७ हजार २६२ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यांना आतापर्यंत ९४ हजार २२१ मते मिळाली आहेत. तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना ५६ हजार ९५९ मते मिळाली आहेत.

देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आतापर्यंत मतमोजणीच्या २५ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने २५ व्या फेरीची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार काँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना २५ व्या फेरी अखेर ९४ हजार २२१ मते मिळाली आहेत. भाजपचे सुभाष साबणे यांना ५६ हजार९५९  मते मिळाली आहेत. काँग्रेसचे उमेदवार अंतापूरकर ३७ हजार २६२ मतांनी आघाडीवर आहेत.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 २५ व्या फेरीअखेर अन्य उमेदवारांना मिळाली मते अशीः

  • विवेक केरूरकर (संयुक्त जनता दल)- ४११
  • प्रा. परमेश्वर वाघमारे ( बहुजन समाज पार्टी)-१२९
  •  डी.डी. वाघमारे (रिपाइं-खोब्रागडे)-१८७
  • अरूण दापकेकर (अपक्ष)-११५
  •  साहेबराव गजभारे (अपक्ष)-१६३
  •  भगवान खंदारे (अपक्ष)- २२८
  •  मारोती सोनकांबळे (अपक्ष)-१९८
  • विमल वाघमारे (अपक्ष)- ३९६
  •  कॉ. प्रा. सदाशिव भूयारे (अपक्ष)- ४१६
  • नोटाः ९१९

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा