दिल्लीतील दंगलखोरांना सुरक्षा दलातील जवानांप्रमाणे देण्यात आले होते प्रशिक्षण!

0
114
दिल्लीतील दंगलीच संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली कोणत्याही दंगलीत दंगलखोरांनी पेट्रोल बॉम्बचा वापर केल्याचा किंवा दगडफेक केल्याच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र राजधानी दिल्लीत घडलेल्या दंगलीत दंगलखोरांनी धक्कादायक तंत्राचा वापर केला असून हे तंत्र भारतात घडलेल्या दंगलीत पहिल्यांदाच वापरण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीच्या दंगलखोरांना सुरक्षा दलातील जवानांप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आले होते, हे स्पष्ट होऊ लागले आहे.

दंगलखोरांनी या धक्कादायक तंत्राचा वापर शिव विहार भागातील डीआरपी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये केला. दंगलखोरांनी या शाळेत उतरण्यासाठी शाळेला लागून असलेल्या इमारतीची मदत घेतली. या चार-पाच मजली इमारतीच्या छतावर रस्सी बांधण्यात आली होती. त्या रस्सीच्या सहाय्याने दंगलखोर शाळेत उतरले. एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दंगलखोरांनी अशा प्रकारे रस्सीचा वापर करण्याची ही देशातील दंगलीच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

शाळा उद्धवस्त करताना पकडण्याचा प्रयत्न झाला तर रस्सीच्या मदतीन पुन्हा इमारतीच्या छतावर परत जाता यावे, या तयारीनेच दंगलखोर डीआरपी शाळेत उतरले होते. रस्सीच्या साह्याने चार-पाच मजली इमारतीच्या छतावर चढणे किंवा उतरने ही सर्वसामान्यांच्या आवाक्यातील बाब नाही. त्यासाठी प्रशिक्षणच घ्यावे लागते. त्यासाठी किमान दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. असे प्रशिक्षण लष्कर आणि पोलिसांच्या जवनांना देण्यात येते. याचाच अर्थ दिल्लीतील दंगलखोरांना रस्सीच्या मदतीने चढण्याचे आणि उतरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते आणि दंगलखोर व्यावसायिक होते. त्यामुळे दिल्लीतील हे दंगलखोर नेमके कोण होते? आणि त्यांना रस्सीच्या साह्याने चढण्या-उतरण्याचे प्रशिक्षण कुणी दिले होते?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

‘ही घटना सोमवारी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यानची आहे. दंगलखोर रस्सीच्या साह्याने खाली उतरले. त्यांनी शाळेचे गेट तोडले. त्यानंतर दीड-दोन हजार लोक शाळेत घुसले आणि त्यांनी शाळेची तोडफोड केली. दंगलखोरांनी संगणक, लॅपटॉप, एम्लिफायर लुटून नेले. कारण तोडफोडीच्या ठिकाणी यापैकी कशाचेही अवशेष सापडलेले नाहीत, असे ’शाळेचे प्रशासकीय प्रमुख धर्मेश शर्मा यांनी इंडिया टुडेला सांगितले. दंगलखोर अनेक तास शाळेची तोडफोड करत राहिले आणि निघून गेले. २४ तास शाळा जळत राहिली आणि पोलिस एक दिवसानंतर आले, असे शर्मा सांगतात. यावरून दिल्ली पोलिस काय करत होते?, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

दंगलग्रस्त भागात सुमारे ५ हजार राऊंड गोळ्या चालवण्यात आल्या, असे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे. याचाच दंगलखोरांनी मोठ्या प्रमाणात देशी कट्टे किंवा पिस्तुले गोळा केली होती. दंगलखोर शस्त्रे गोळा करत असताना त्याची भनकही देशाच्या गुप्तहेर यंत्रणेला लागली नाही. त्यामुळे दिल्लीतील दंगल गुप्तचर यंत्रणेचेही अपयश मानले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा