महाराष्ट्रातील सात रुग्णांत आढळला डेल्टा प्लस व्हेरिएंट, एकट्या रत्नागिरीत पाच रुग्ण

0
135
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यातून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये SARS-Cov-2 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे, हे पडताळून पाहण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यापैकी पाच रुग्ण एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

भारतात आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन होऊन डेल्टा प्लस हा नवा विषाणू तयार झाला आहे.

आम्हाला नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला. त्यानंतर आम्ही आणखी नमुने पाठवले, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन (डीएमईआर) संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या सातपैकी पाच रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत. पाच जणांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आल्यामुळे ही गावे बंद करण्यात आली आहेत. कंटेन्ट झोन तयार करण्यात आले आहेत. पाचपैकी दोन रुग्णांत कोणतीही लक्षणे नाहीत, असे रत्नागिरीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्र गावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा