मी 79 तासांतच पुन्हा गेलो: देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, सरकार कोसळले!

1
160
संग्रहित छायाचित्र.

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. अवघ्या 79 तासांतच बहुमताअभावी फडणवीस सरकार कोसळले.

सकाळी अजित पवार यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन काही कारणास्तव आपण या युतीमध्ये कायम राहू शकत नाही, असे सांगितले आणि उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अजित पवार आमच्या युतीतून बाहेर पडल्यामुळे आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा राहिलेला नाही. आम्ही आमदारांची फोडाफोडी करणार नाही, अशी आम्ही आधीपासूनच भूमिका घेतली होती, असे फडणवीस यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्यामुळे महाविकास आघाडीचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा