धनंजय मुंडे प्रकरणः जबाब नोंदवण्यासाठी रेणू शर्मा पुन्हा पोलिस ठाण्यात

0
249
छायाचित्रः ट्विटर

मुंबईः परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप करणारी गायिका रेणू शर्मा पुन्हा डीएन नगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. तिथे तिचा जबाब नोंदवला जात आहे.

धनंजय मुंडे यांच्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करून रेणू शर्माने खळबळ उडवून दिली होती. या आरोपामुळे मुंडेच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत असतानाच मुंबई भाजपचे उपाध्यक्ष कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनीष धुरी यांनी रेणू शर्मा ही प्रतिष्ठित पुरूषांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करणारी महिला असल्याचे सांगितल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आणि मुंडेचे मंत्रिपद बचावले.

आज डीएन नगर पोलिसांनी रेणू शर्माला पुन्हा एकदा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. १४ जानेवारील सहायक पोलिस आयुक्त ज्योत्सना रासम यांच्यासमोर तिचा जबाब नोंदवला जात आहे. यावेळी रेणू शर्माचे वकील रमेश त्रिपाठी हेही उपस्थित आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा