धनंजय मुंडेंची आमदारकी गेली तर….परळीत पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित

0
1615
संग्रहित छायाचित्र.

परळी/मुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील एका महिलेने बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून आता निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्यामुळे मुंडे यांची आमदारकी रद्द होण्याची चर्चा सुरु झाल्याने परळीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आपण एका महिलेशी सहमतीने संबंधात होतो आणि तिच्यापासून आपल्याला दोन मुले आहेत. त्यांनी मी माझे नावही लावलेले आहे. हे सर्व माझी पत्नी आणि कुटुंबियांनाही माहीत आहे, असे सांगत धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर जाहीर कबुली दिली आहे.

हेही वाचाः प्यार किया तो डरना क्या… म्हणत धनंजय मुंडेंची शिवसेना मंत्री सत्तारांकडून पाठराखण

ती महिला धनंजय मुंडे यांची कायदेशीर पत्नी नसल्यामुळे मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात पत्नीची माहिती लपवली, असे म्हणता येत नाही. परंतु दोन मुलांची माहिती लपवल्याचा मुद्दा मुंडे यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो आणि याच मुद्यावरून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी भाजप नेते किरिट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हेही वाचाः मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या, आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

धनंजय मुंडे प्रकरणात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पंकजा मुंडे यांच्याकडून मात्र या प्रकरणात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मुंडे यांचे हे प्रकरण पंकजांना आधीपासूनच माहीत आहे, असेही जाणकार सांगतात. असे असले तरी या प्रकरणात धनंजय मुंडेंची आमदारकी गेलीच तर त्यांचे मंत्रिपदही जाणार, हे जवळपास निश्चित असल्यामुळे पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते कमालीचे उत्साहित झाले आहे. परळी विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक लागेल आणि पंकजा पुन्हा आमदार होतील, अशी त्यांना आशा वाटू लागली आहे.

हेही वाचाः बलात्काराच्या आरोपावर धनंजय मुंडेंनी सोडले मौन, नेमके काय घडले त्याचा केला खुलासा

रेणू शर्मांनाच निवडणूक प्रचारात उतरवण्याचीही अटकळः धनंजय मुंडे यांची आमदारकी गेली आणि परळीत पोटनिवडणूक लागलीच तर धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनाच धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणूक प्रचारात उतरवण्याची अटकळही काही कार्यकर्ते बांधत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना निवडणूक सहजसोपी जाईल, असेही काही कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे.

धनंजय मुंडे सिल्वहर ओकवरः या सर्व वादाच्या पार्श्वभूमी धनंजय मुंडे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचून त्यांनी यावादाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याचे सांगण्यात येते.

संजय राऊत म्हणतात हा कौटुंबिक वादः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे प्रकरण कौटुंबिक असल्याचे म्हटले आहे. राजकीय विषयात आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही. पण कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करू नये. ते राजकारणाचे विषय नसतात. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात. एका क्षणात चिखलफेक करून संपूर्ण जीवन उद्धव करत असतो. हे राजकीय लोकांनी आपआपसात करू नये, असे राऊत म्हणाले. हे आपण पूर्णपणे धनंजय मुंडे यांच्यावर सोडले पाहिजे. हा पूर्णपणे त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा