माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करू नकाः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे आवाहन

0
553
छायाचित्रः ट्विटर

मुंबईः राजकारणात दीर्घकाळ काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते, मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असतानाच आता पाटील यांनी माध्यमांनी माझ्या विधानाची मोडतोड करू नये, असे आवाहन केले आहे.

जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील एका स्थानिक यूट्यूब चॅनेलला दिलेली मुलाखत सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या या मुलाखतीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे पाटील यांनी माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये असे म्हटले आहे.

हेही वाचाः मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते, पण…: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितली ‘मन की बात’

जयंत पाटील यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन लोकमतमध्ये आलेले असून माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. सोबत त्यांनी या बातमीचे कात्रणही जोडले आहे.

हेही वाचाः मोदींसह सर्व राज्याचे मुख्यमंत्री, आमदार-खासदार घेणार कोरोनाची लस

काय म्हणाले जयतं पाटील?: दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे हे पद नाही. प्रथम पक्ष व आमदारांची संख्या वाढवावी लागेल. त्यानंतर पक्ष आणि शरद पवार जो निर्णय देतील, तो आम्हास मान्य असेल, असे जयंत पाटील यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा